• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

दि.9 : एकाच हॉस्पिटलमधील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. हे प्रकरण आहे गंगाराम रुग्णालयातील. यातील पाच जणांना रुग्णालयत दाखल करण्यात आलं आहे. तर, इतर डॉक्टर सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या 37 डॉक्टरांपैकी बहुतेक जण कोरोना रुग्णांवर उपचार करणारे होते.

रुग्णालयातील पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांमध्ये काही हलकी लक्षणं असून कोणीही गंभीर स्थितीमध्ये नाही. दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली सरकारनं लोक नायक रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठीच्या बेडची संख्या 1000 वरुन वाढवून 1500 केली आहे. सोबतच जीटीबी रुग्णालयातील बेडची संख्या 500 वरुन 1000 केली आहे. याशिवाय दातांच्या डॉक्टरांनाही कोविड रुग्णालयांमध्ये ड्यूटीवर ठेवलं जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहाता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *