• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

कात्रज (दि. ०९) : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आंबेगावमधील भारती विद्यापीठ परिसरात आधार सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून एका रिकाम्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर चालू करण्याचा काही डॉक्टरांनी प्रयत्न केला होता. त्याला महापालिकेकडून रितसर परवानगीही मिळाली होती. मात्र, याला काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने हे कोविड केअर सेंटर चालू होण्याच्या आधीच आधीच बंद करण्यात आले आहे. ना नफा ना तोटा तत्वावर २० ऑक्सिजन बेड आणि २० आयसोलेशन बेडचे कोविड केअर सेंटर उभारणीसाठी महापालिका प्रशासनाने आणि परवाना विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी मनिषा नाईक कोरोनाची सद्यस्थिती आणि बेड्सची अनुउपलब्धता लक्षात घेता २४ तासांत या कोविड सेंटरला परवानगी दिली होती.

नागरिकांनी दर्शविलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि डॉक्टर्स यांच्या एक बैठक झाली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे वृद्ध लहान मुले आहेत. आमच्या जिवाला धोका आहे. म्हणून या भागात कोविड सेंटर नको, यावेळी डॉक्टरांकडून आम्हालाही आई-वडील मुलं आहेत. सध्या शहरातील परिस्थिती वाईट आहे. अशी भूमिका मांडण्यात आली. परंतु, तोडगा निघाला नाही. अखेर आता हे सेंटर दुसऱ्या ठिकाणी चालू करण्याचा आधार फाऊंडेशनचा निर्णय झाला आहे. ५ एप्रिलला या सेंटरसाठी परवानगी मिळाली होती. त्यानंतर नागरिकांचा विरोध पाहून डॉक्टरांनी परवानगी रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हे कोविड सेंटर चालू करण्यात येणार होते. शहरातील जास्तीत जास्त कोविड सेंटर ही नागरी वस्तीत आहेत. काही ठिकाणी खाली रुग्णालय आणि वर लोक राहतात. परंतु, नागरिकांच्या विरोधामुळे आम्हाला कोविड सेंटर बंद करावे लागत आहे.
– डॉ. रविंद्रकुमार काटकर, संचालक, आधार फाऊंडेशन

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *