• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

दि.9 : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. सद्यस्थितीत हा विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत कोविडच्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.

पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लाँकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिल्याचे झी 24 ने वृत्त दिले आहे. या बैठकीत राज्यात पुढील पूर्ण आठवडा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

उद्याच्या बैठकीत मागील वर्षी जसा कडक लॉकडाऊन होता तसा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं. तसा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते, भाजपचे नेते त्याचबरोबर मनसे, रिपाई, समाजवादी पक्ष यासह सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.

राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. दुसरीकडे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे, बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकार आता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *