• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

दि.9 : कोरोना रुग्णांवर जनआरोग्य योजने अंतर्गत तीन लाखांपर्यंत मोफत उपचार करता येतात. यासाठी काही कडक निकष आहेत. निकषात बसणाऱ्यांना या योजनेतून कोरोनावर तीन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. कडक निकष केल्याने सोलापूर शहर-जिल्ह्यातील 60 हजार 483 रुग्णांपैकी केवळ तीन हजार 876 रुग्णांनाच या योजनेतून मोफत उपचार मिळाले आहेत. या संदर्भात सकाळ वेबसाईटने वृत्त दिले आहे.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार जनआरोग्य योजनेच्या लाभाचे निकष
●कोरोनासंबंधीची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येणे बंधनकारक
●पॉझिटिव्ह रुग्णाकडे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड आवश्‍यकच
●रुग्णाची ऑक्‍सिजन लेव्हल 90 पेक्षा कमी असावी; रुग्णाला निमोनिया असावा
●कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा सिटी स्कॅनचा स्कोअर किमान आठपर्यंत असणे अनिवार्य
●रुग्णांवरील उपचारासाठी योजनेतून 16 हजार, 20 हजार आणि 65 हजार रुपयांचे पॅकेज

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल, पंढरपुरातील नवजीवन, जनकल्याण, सेवा रुग्णालय, लाईफलाईन सुपरस्पेशालिटी रुग्णालय, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, देवडीकर मेडिकल सेंटर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, अश्‍विनी ग्रामीण सहकारी रुग्णालय, कदम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर सुपरस्पेशालिटी व गॅलेक्‍सी हॉस्पिटल, गंगामाई हॉस्पिटल, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, डॉ. कासलीवाल मेडिकल केअर ऍण्ड रिसर्च सेंटर, यशोधरा हॉस्पिटल, अश्‍विनी सहकारी रुग्णालय, मोनार्क हॉस्पिटल, लोकमंगल जीवक हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल, चंदन न्युरो सायन्स हॉस्पिटल, दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कल्याणरावजी भातलवंडे बालरुग्णालय, अकलूज क्रिटिकल केअर ऍण्ड ट्रामा सेंटर, श्री गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुश्रूत हॉस्पिटल, आरएच हॉस्पिटल बार्शी, एसडीएच 50 करमाळा, सुविधा आयसीयू ऍण्ड कॅथलॅब सेंटर एलएलपी, श्रीनंद हॉस्पिटल, गेट वेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एसडीएच बासमत ऍण्ड ट्रामा युनिट, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, एसडीएच 50 गांधी नगर, महिला हॉस्पिटल, एसडीएच 50 अकलूज आणि अश्‍विनी ग्रामीण कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल याठिकाणी उपचार केले जात आहेत. त्यापैकी सर्वोपचार रुग्णालयातून सर्वाधिक 942 रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर सुश्रूत हॉस्पिटल (225), मार्कंडेय रुग्णालय (437), अश्‍विनी सहकारी रुग्णालय (270) या रुग्णालयांमध्ये दोनशेहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित रुग्णालयांमध्ये तीन ते 186 रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *