• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

दि.12 : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक राज्यात रुग्ण वाढत आहेत. मात्र सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशभरात आढळणाऱ्या एकूण रुग्ण संख्येपैकी जवळपास अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात समोर येत आहेत. यातच, निवडणूक असलेल्या राज्यांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ का नाही? याचा तपास करावा, असे आम्ही आपल्या टास्क फोर्सला सांगितले असल्याचे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री असलम शेख यांनी म्हटले आहे.

मंत्री असलम शेख म्हणाले, ‘महाराष्ट्रातच कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे. अनेक मंत्री मोठ्या गर्दीत निवडणूक प्रचार करत  आहेत. असे असतानाही तेथील कोरोना रुग्ण संख्येत वाढ नाही,’ याचा अभ्यास करावा, असे आम्ही कोविड टास्क फोर्सला सांगितले आहे.

कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यांनी इतर राज्यांचा उल्लेख केला नसला तरी, अप्रत्यक्षपणे त्यांनी इतर राज्यांत कोरोना टेस्ट कमी होत आहेत असेच म्हटले होते.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *