• Pune
  • May 5, 2021
0 Comments
Spread the love

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.

त्याचा हा सीएसकेसाठी २०० वा सामना होता. यासह, धोनी विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा केवळ दुसरा खेळाडू बनला.

धोनीने केला हा कारनामा
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरताच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने एका खास विक्रमाची नोंद आपल्या नावे केली. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी शुक्रवारी आपला २०० वा सामना खेळला. यासह धोनी एकाच संघासाठी २०० आयपीएल सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनला.

यापूर्वी, आयपीएलमध्ये एकाच संघासाठी २०० सामने खेळण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने नोंदविला होता. विराटने २००८ पासून आजतागायत आरसीबीसाठी २०९ सामने खेळले आहेत.

एकाच संघासाठी सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सुरेश रैनाचा तिसरा क्रमांक लागतो. त्याने, चेन्नई सुपर किंग्सचे १९० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.

चेन्नईच्या गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी
या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. दिपक चहरने आपल्या चार षटकांमध्ये अवघ्या १३ धावा देऊन ४ बळी आपल्या नावे केले. सॅम करन, मोईन अली व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली. पंजाबसाठी शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने निर्धारित २० षटकात ८ बाद १०६ धावा केल्या.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *