• Pune
  • May 5, 2021
0 Comments
Spread the love

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी गोलंदाज आर. अश्विनला त्याचे शिल्लक असलेले एक षटक गोलंदाजी न देणे ही चूकच होती, असे जाहीर मत पाँटिंग यांनी व्यक्त केले.

पराभवाची कारणमीमांसा करताना जेव्हा आमची एकत्र येऊ, तेव्हा मी याबाबत पंतला विचारणार आहे, असे पाँटिंग यांनी पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विजयाची संधी असलेल्या दिल्लीने हा सामना अखेरच्या षटकात गमावला.

अश्विनने त्याच्या तीन षटकांत फारच चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या १४ धावाच त्याने दिल्या होत्या. त्यात एका चौकाराचाही समावेश नव्हता. पहिल्या सामन्यात भले अश्विनला लय मिलाली नव्हती. त्याने अधिक धावा दिल्या होत्या; परंतु त्यावर त्याने मात करून कालच्या सामन्यात टिच्चून मारा केला होता. त्याचे उरलेले एक षटक पूर्ण न करणे ही आमची चूक होती, असे स्पष्ट मत पाँटिंग यांनी व्यक्त केले.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अश्विनने सातव्या, नवव्या आणि ११ व्या षटकात गोलंदाजी केली. त्या वेळी राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर मैदानात होते; परंतु त्यांनाही अश्विनविरुद्ध चौकार मारता आला नव्हता. दव पडण्याची शक्यता असल्याने एकाच वेळी फिरकी गोलंजाचा कोटा पूर्ण करणे महत्त्वाचे होते; परंतु पंतने १३ व्या षटकांत अश्विनला विश्रांती देत मार्कस स्टॉयनिसला गोलंदाजी दिली आणि मिलरने त्याला सलग तीन चौकार मारून दिल्लीची पकड सैल केली. त्यानंतर अश्विनला पुढे गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *