• Pune
  • May 5, 2021
0 Comments
Spread the love

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत आमदार पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे ही मागणी केली. जिल्ह्यात कोरोनामुळे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. परंतु जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आज साडेतीन हजार रेमडेसिव्हीर उपलब्ध झाले. त्यापैकी पुणे महापालिकेला दोन हजार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला दीड हजार इंजेक्शन देण्यात आले. उद्या किती रेमडेसिव्हीर येणार, हे जिल्हा प्रशासनाला माहित नाही.

रेमडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी मध्यंतरी कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर उत्पादन बंद केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तुटवडा निर्माण झाल्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत रुग्णांचे हाल होणार आहेत. ससून रुग्णालयात बेडची क्षमता वाढविण्याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *