• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. या ऋतुत तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे आलेल्या या दिवसांत आजाराचा आणि संसर्गाचा धोका बळावतो. या दिवसांत कोणकोणते आजार होऊ शकतात आणि ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी, ते पाहूया.

टळटळीत उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे हीट स्ट्रोक म्हणजे वारंवार लघवीला होण्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, ताप, स्नायुंचे दुखणे, धाप लागणे अशी शारीरिक लक्षणे जाणवू शकतात.

उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहारामुळे डायरिया होऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचे सेवन करणे टाळावे.

चिकनपॉक्स म्हणजे कांजण्याचा आजार या दिवसात बऱ्याच जणांना झालेला पाहायला मिळतो. यामुळे खाज येणे, फोड येणे, चकत्या येणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसांत हलका आहार घ्यावा. पोटाला थंडावा मिळेल अशी फळे, पदार्थ खावेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरचे दूषित अन्नपदार्थ किंवा सरबत खाल्ल्याने फूड इनफेक्शन होऊ शकते. याकरिता या ऋतुत शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत.

दम्याचे विकार असलेल्यांनी गर्मीच्या दिवसांत जास्त काळजी घ्यावी. या ऋतुत होणाऱ्या प्रदूषणामुळे व्हायरसचा धोका वाढतो. यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. कडक उन्हामुळे घामाद्वारे पाणी शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्याकडे लक्ष ठेवावे. याकरिता सब्जापाणी, कोकम सरबत, नारळाचे सरबत अधूनमधून प्यावे.

अतितीव्र उन्हामुळे व्हायरल फ्लूचा धोका वाढतो. यामुळे ताप, थकवा, डोकेदुखी, सर्दी होऊ शकते.

मम्स हे व्हायरल इंफेक्शन आहे. या विकारात कान आणि तोंडाचा जबडा यांच्यामध्ये असलेल्या पेराटिड ग्रंथी प्रभावित होतात. गालाच्या खालच्या भागाला सूज येते.

उन्हाळ्यात सतत तहान लागते. त्यामुळे थंडगार पेय, आईस्क्रिम खाणे किंवा पाणी पिणे लोकांना आवडते, मात्र यामुळे सर्दी, खोकल्याचा, घसादुखीचा त्रास होतो.

कडक उन्हात डोकेदुखी होणे स्वाभाविक आहे. या मोसमात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढते.

अतिशय प्रखर उन्हामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकते. यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इंफेक्शन होऊ शकते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात टोचल्यासारखे होणे, डोळ्यांना लाली येणे असे त्रास होऊ शकतात. याकरिता उन्हात फिरताना गॉगल वापरावा, डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *