• Pune
  • June 17, 2021
0 Comments
Spread the love
मेष

आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल…

वृषभ

महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. आलेली संधी गमावून बसाल…

मिथुन

आज सांभाळून राहण्याचा सल्ला. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील…

कर्क

आज व्यापारात लाभाचे योग. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल…

सिंह

नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दिवस आनंदात जाईल… ​​​

कन्या

आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल…

तूळ

आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आरोग्याला घातक अन्न ग्रहण करू नका. प्रवासात विघ्ने येतील. आपला आनंद द्विगुणित होईल…

वृश्चिक

सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात विघ्न येऊ शकते…

धनु

आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. योजनेप्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. गृहस्थीजीवनात गोडी राहील. अचानक धनलाभ होईल…

मकर

कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तब्बेत चांगली राहील. त्या दृष्टीने बाहेरचे खाणे-पिणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील…

कुंभ

विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल. त्यामुळे कार्यपूर्ती होण्यात कसलीच अडचण येणार नाही…

मीन

काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने दैनंदिन काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ…

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *