• Pune
  • April 22, 2021
0 Comments
Spread the love

दि.7 : आधार कार्ड हे महत्वाचे आहे. अनेक सरकारी योजनेसाठी, बँकेत, मोबाईल सिम कार्ड घेताना आधार कार्ड (Aadhar Card) लागते. आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी बऱ्याच वेळा आधार सेंटर मध्ये जावे लागते. परंतु आता आधार सेंटर मध्ये न जाता आधार कार्ड डाऊनलोड करता येईल.

(Aadhaar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट असून त्याचा वापर हा सर्व ठिकाणी केला जातो. आधार कार्ड तुम्हाला अपडेटेड डिटेल्स सोबत हवे असेल तर UIDAI चे एक नवीन फीचर आले आहे. हे आधार कार्ड वापर करणाऱ्या युजर्संना खूप फायदेशीर ठरणार आहे. फेस ऑथेंटिकेशन असं या नवीन आधार कार्ड फीचरचं नाव आहे. म्हणजेच आता आधार कार्ड होल्डर व्यक्ती ऑनलाईन आपल्या चेहऱ्याच्या मदतीने आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो. यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. फेस ऑथेंटिकेशन फीचर विना ओटीपी काम करते. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून आपल्या लॅपटॉपवरून करू शकता.

असा करा ‘या’ फीचरचा वापर

  • सर्वप्रथम तुम्हाला यूआयडीएआय uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर Get Aadhaar Card हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • असं केल्यावर face authentication हा पर्याय दिसेल.
  • Face Authentication निवडण्यापूर्वी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल
  • तुम्हाला ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे चेहरा वेरिफाय करावा लागेल.
  • यानंतर ओकेवर क्लिक करा, हे करताच कॅमेरा सुरू होईल. आपला संपूर्ण चेहरा एका चौकटीत येईल अशा प्रकारे आपल्याला कॅमेरासमोर बसावे लागेल. 

कॅमेरा आपला फोटो घेईल आणि ही प्रक्रिया येथेच संपेल. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

आपण जवळच्या पोस्ट ऑफिसवर आधार कार्डची (Aadhaar Card) नोंदणी किंवा अपडेशन करू शकता, यासाठी या सुविधेची संपूर्ण यादी प्रत्येक राज्यात उपलब्ध आहे असं म्हटलं आहे. आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. आता ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत. बायोमेट्रिक तपशील देखील आधार सेवा केंद्रात अद्ययावत केले जातील. आता हे काम पोस्ट ऑफिसमध्ये देखील करता येणार आहे. आपली आधार माहिती अद्ययावत झाल्यास त्याकरिता आपल्याला चार्ज द्यावे लागेल. प्रत्येक वेळी माहिती अद्ययावत केल्यावर याची किंमत 50 रुपये आहे.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *